घरफोडीच्या गुन्ह्यांतील 28 वर्षापासून फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यांतील 28 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.10)  केली. विष्णु सुंदरराव विटकर (वय 45, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर याने 1992 साली कोथरूड परिसरात घरफोडी केली होती तेव्हापासून तो फरार होता. गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना हा आरोपी हडपसर येथे आला असल्याची माहिती पथकाला मिळाली.त्यानुसार सापळा रचून त्याला दुपारी तीनच्या दरम्यान ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोथरुड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.