नाणे मावळात करंजगाव येथील २८ वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या
कामशेत : नाणे मावळातील करंजगाव येथील एका २८ वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
किशोर सुरेश तंबोरे (वय २८ वर्ष, रा. करंजगाव ता. मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पप्पु सुरेश तंबोरे (वय ३२, रा. करंजगाव ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ( दि.११) रोजी नाणे मावळातील करंजगाव हद्दीतील पमाजी चिंधु खराडे यांचे शेताचे लगत, मोरमारवाडी ते करंजगाव रस्त्याच्या साईड पट्टीवर रविवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून किशोर याच्या तोंडावर, डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी लंबोते, पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोसई पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!