पडळकर म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ सुनिल शेळकेंनी घेतला खरपूस समाचार!

मंगळवेढा : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत आरोप प्रत्यारोप यांची खेळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.त्यांच्या या टीकेचा समाचार पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घेतला. आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची उपमा देत त्यांच्यावर सडकून टीका आहे. त्यामुळे पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू झाली आहे.

भाजपच्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचारासाठी त्यांना पराभूत केलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

कचरेवाडी येथील सभेत बोलताना आमदार शेळके म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा पूर्वी विचाराचा पक्ष होता. मीही त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो; परंतु सध्याच्या काळात तो विचारांचा पक्ष राहिलेला नाही. पैसेवाला आणि कलाकार असला का त्याला लगेच पक्षात प्रवेश दिला जातो, त्यामुळे अशा कलाकार मंडळीकडून आरोप केले जातात.

(स्व.) आमदार भारत भालके यांची मतदाराच्यांसाठी प्रश्न सोडविण्याची तळमळ होती. विशेषतः विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करणे आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, हे आपले शेवटचे काम असून आपली शेवटची आमदारकी असल्याचे आपणास सांगितले होते. आज त्यांच्या जाण्याने मतदारसंघ पोरका झाला असला तरी मतदारसंघात असलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार न देता पाठिंबा देणे अपेक्षित होते. परंतु उमेदवार उभा करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाल्ल्यासारखा प्रकार भाजपने केला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केला

आमदार पडळकर यांनी बोलताना समोरच्या व्यक्तीची राजकीय कारकीर्द व त्यांनी मतदारसंघात केलेले काम हे विचारात घ्यावे. आपल्याला विधान परिषद दिली म्हणजे फार मोठी संधी दिल्यासारखे समोरच्याला वाटेल तसे बोलण्याचे धाडस करू नये. ते जसे धनगर समाजाचे नेते आहेत, त्याप्रमाणे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व महादेव जानकर हे देखील त्या समाजाचे नेते आहेत. परंतु या दोघांनी बोलताना आपली पातळी कधी सोडली नाही, अशा शब्दांत आमदार शेळके यांनी गोपीचंद पडळकर यांना चांगलेच सुनावले आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा शेळके यांनी चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. आमदार शेळके म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा पूर्वी विचाराचा पक्ष होता. मीही त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो, परंतु सध्याच्या काळात तो विचारांचा पक्ष राहिलेला नाही. पैसेवाला आणि कलाकार असला का त्याला लगेच पक्षात प्रवेश दिला जातो, त्यामुळे अशा कलाकार मंडळीकडून आरोप केले जातात.

स्वर्गीय आमदार भारत भालके यांची मतदाराच्यांसाठी प्रश्न सोडवण्याची तळमळ होती. विशेषतः विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करणे आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, हे आपले शेवटचे काम असून आपली शेवटची आमदारकी असल्याचे सांगितले होते. त्यांच्या जाण्याने मंगळवेढा मतदारसंघ पोरका झाला असला तरी मतदारसंघात असलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये भाजपने उमेदवार न देता पाठिंबा देणे अपेक्षित होते. परंतु उमेदवार उभा करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाल्ल्यासारखा प्रकार भाजपने केला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

“अजित पवारांचे बोलणं टग्याचं आणि रडणं बाईसारखं अशी गत आहे. ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेले आहे. अजित पवारांचे सगळे राजकारणच चुलत्यांच्या जीवावर आहे. पण आमचे राजकारण हे बारा बलुतेदार आणि गोरगरिबांच्या पाठींब्यावर आहे”, असेही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

अजित पवारांनी स्वतःची लायकी काय हे इथल्या लोकांना सांगावे !

अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “माझ्यावर टीका करण्याआधी अजित पवारांनी स्वतःची लायकी काय आहे हे इथल्या लोकांना सांगावे. माझं डिपॉझिट जप्त झाले हे जगजाहीर आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी माझा हक्काचा मतदारसंघ सोडून बारामतीत येऊन निवडणूक लढलो. मला लोकांनी नाकारले. मात्र, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारही मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढला. तिकडे त्यालाही अपयश आले. तेव्हा काय झालं?” असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.