महाराष्ट्रात किती दिवसांचा लॉकडाऊन? आरोग्यमंत्री राजेश टोपें म्हणाले…

जालना :महाराष्ट्रात कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोना विषाणूची साखळी करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.

‘राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही’ : मुख्यमंत्री

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता  लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले.  सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

…नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर- मुख्य सचिवांचा इशारा 

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोनासंबंधी सादरीकरण देखील केलं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.