सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझीला अटक

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी वादग्रस्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला यापुर्वीच एनआयएनं अटक केलेली आहे. एनआयए सखोल तपास करीत असतानाच आता सचिन वाझेचा सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझी याला एनआयएनं अटक केली आहे. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएनं रियाझ काझी यांची चौकशी केली होती. सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाझ काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी पीएसआय रियाज काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे

सचिन वाझे हा स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहे. त्याचा साथीदार रियाझ काझीला अटक केल्यानं अनेक गोष्टींचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे. रियाझ काझी हे सन 2010 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदावरून पदोन्नती झाल्यानंतर रियाझ काझी यांची पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. दरम्यान, सचिन वाझेनं 9 जूनला सीआययु पथकाचा प्रभारी म्हणून पदभार स्विकारला होता. तेव्हापासुन रियाझ काझी आणि सचिन वाझे हे एकत्र काम करत होते. दोघांचे अतिशय चांगले संबंध होते आणि आता एनआयएनं रियाझ काझीला अटक केल्यामुळे त्यांचे संबंध किती चांगले होते हे स्पष्टच झालं आहे.

कोण आहेत एपीआय रियाझ काझी?

रियाझ काझी हे 2010 च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली

पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.