पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन पाहिजे असेल तर ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा

पुणे : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय. राज्यात वाढणारी बाधितांची संख्या रोज एक नवा विक्रम करत आहे.वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रचंड ताण आल्याचे चित्र आहेे.कोरोनावर उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीरचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक ठिकाणी रेमेडेसिव्हीर खरेदी करण्यासाठी लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. पुण्यात तर रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमेडेसिव्हीरची मोठी गरज भासत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेमेडेसिव्हीर इंजेक्शन वितरणासाठी नियत्रंण कक्ष सुरु केला आहे. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे हा यामागचा उद्देश आहे.

 

फक्त एक कॉल करा 

पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे रोज हजारो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. तसेच येथे औषधांचासुद्धा तुटवडा जाणवतोय. रेमेडेसिव्हीरसारख्या इंजेक्शनचा काळा बाजार जोमता सुरु असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा करुन ठेवणे, नंतर ते अवैधरित्या चढ्या भावाने विकणे असे प्रकार येथे अनेक ठिकाणी घडत आहेत. ही गंभीर परिस्थिती घेऊन पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ज्यांना रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची गरज असेल त्यांना फक्त एका कॉलवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 020-26123371 किवा 1077 टोल फ्री नंबरवर कॉल केल्यांनतर रेमेडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार आहे. हे नियंत्रण कक्ष आगामी 31 मे पर्यंत सुरु राहील.

काय आहेत केंद्र सरकारचे आदेश?

पुढील काही दिवसांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्‍शनच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे औषानिर्माण विभाग देशामध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात असून त्याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे.

तसेच औषधनिर्माण विभागाने या इंजेक्‍शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर आपल्याकडील रेमडेसिवीरचा उपलब्ध साठा व अधिकृत विक्रेते याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचा सल्ला दिलाय. याखेरीज संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना रेमडेसिवीरचा काळाबाजार व साठेबाजी होऊ नये यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.