रस्त्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला, लोहगाव परिसरात तणावाचे वातावरण

पुणे :  रस्त्याच्या वादातून एका तरुणाचे हात-पाय बांधत त्याला त्याच रस्त्यावरून फरफटत नेत एकाच कुटुंबातील 8 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. लोहगाव परिसरात खांदवे नगर या ठिकाणी शनिवारी रात्री हा प्रकार घडला. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत ४ जणांना अटक केली आहे.या घटनेने लोहगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी अभिजित बाळासाहेब शेजवळ (वय 27) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष खांदवे (वय 26), ओमकार खांदवे (वय 25), महादू खांदवे (वय 50) , साधू खांदवे (वय 50), राजू खांदवे (वय 45), माया खांदवे (वय 45), निलेश खांदवे (वय 30), आणि प्रसाद देवकर (वय 29) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी लोहगाव येथील खांदवे नगर परिसरात राहतात. अभिजित व महादू खांदवे यांच्यात पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद आहेत. दरम्यान, शनिवारी फिर्यादी खांदवे नगर येथील मित्राच्य घराजवळ थांबले होते. यावेळी संतोष शिंदे येथे आला. त्याने ‘आमच्या हद्दीत का आला?’ तुझ्या भावाला आधीच खपवला आहे, आता तुला पण खपवाचे आहे का?’ असे बोलून त्याला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास देखील सुरुवात केली. हात-पाय बांधून त्यांना फरफटत ओढत नेले. तसेच ओमकार खांदवे याने कोयत्याने फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी संतोष खांदवे देखील फिर्यादीच्या पाठीत लोखंडी रॉड मारला. यावेळी फिर्यादी यांच्या आई भांडण सोडवण्यास आल्या. तर आरोपीना त्यानांही मारहाण केली आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.