कामशेतच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फिजिकल डिस्टंसिंग चा फज्जा
कामशेत;पंतप्रधानांपासून ते गावपातळीपर्यंत सर्वच जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मात्र गावकरी काही ऐकायला तयार नाहीत. फिजिकल डिस्टंसिंगची ची तर त्यांनी ऐशी तैशी करून ठेवली आहे. कामशेत मधील बँक ऑफ महाराष्ट्र समोर तर ग्राहकांनी कहरच केल्याचे दिसून आले.
गेल्या दोन दिवसांपासून वीकएंड लॉकडाउन मुळे बँका बंद होत्या. सोमवारी बँक उघडताच ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी एकच गर्दी केली. कामशेत शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. बँकेत एकावेळी केवळ चारच ग्राहकांना सोडण्यात येत होते तरी देखील बँकेबाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते. त्यांना ना कोरोनाची भीती दिसत होती ना आपल्या कुटुंबाची चिंता वाटत होती. अश्यातच कामशेतच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांनी कोरोनाचे नियम पाळायचे नाहीत असेच दिसत होते.
बँकेबाहेर बँकेने सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले नाही किंवा फिजिकल डिस्टन्स निर्देशीत करतील असे फलक देखील यावेळी लावलेले आढळून आले नाहीत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!