खूनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या सराईत आरोपीला अटक

पुणे : खूनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या सराईत आरोपीला  गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. सौरभ तीमापा धनगर ( वय 22 रा. ताडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा युनिट दोन पथकातील पोलिस रविवारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना बंडगार्डन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी सौरभ धनगरची माहिती मिळाली. तो नदी पात्रात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सौरभ विरुद्ध शरीर आणि मालविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.