चिंतेत भर! कुंभमेळ्यात १०२ साधू कोरोना पॉझिटिव्ह

हरिद्वार : करोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे . हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.

देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून, प्रचंड गर्दीत करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची त्रेधातिरिपट उडत आहे. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ कोटी साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

दरम्यान,  हरिद्वारच्या कुंभमेळ्याला ‘या’ 12 राज्यांतील लोकांना बंदी आपल्या सर्वांना माहितच आहे, की हरिद्वार हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इतर दिवशीही भाविक या स्थळाला आवर्जुन भेट देतात. याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने हरिद्वारला भेट देण्यासाठी येतात. हे लक्षात घेता, राज्य सरकारने कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल 12 राज्यांतील लोकांसाठी अनिवार्य केला आहे. याअंतर्गत पर्यटक आणि भाविकांना त्यांच्यासोबत RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल आणणे बंधनकारक असेल. याबाबत अधिक माहिती देताना सीएम तीरथ सिंह म्हणाले, की सर्व भाविकांना गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

या वृत्तानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील लोकांना हरिद्वार प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी, RT-PCR निगेटिव्ह चाचणी 72 तास आधीची असावी. जर एखाद्या व्यक्तीकडे आरटी-पीसीआर चाचणी अहवाल 72 तासांपेक्षा जुना नसेल, तर त्याला / तिला हरिद्वारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.