मोठी बातमी! मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार; लॉकडाऊनबाबत निर्णयाची शक्यता’
मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज रात्री साडोआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांकडून आज लाॅकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन एसओपी देखील जाहीर होणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही लाॅकडाऊन लागू करण्यास संमती दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर लाॅकडाऊनबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत हा लाॅकडाऊन असण्याची शक्यता आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!