कुंभमेळा ठरला सुपर स्प्रेडर! हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली : देशात करोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक करोनाबाधित आढळून आले आहेत

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने कुंभमेळ्यात करोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केले जात नसल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचे दिसून आले.

गंगामातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही – मुख्यमंत्री रावत

गंगामातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे. भाविकांची गंगामातेवर श्रद्धा आहे. गंगामातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी केला आहे. गेल्यावर्षी झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाची तुलना या कुंभमेळ्याशी करून नये. ही तुलना चुकीची असल्याचेही रावत म्हणाले.

‘प्रोटोकॉल’चा बोजवारा

  • देशात दिवसाला कोरोनाचे दिड लाखांवर रुग्ण आढळत  असून त्याचवेळी कुंभमेळा सुरू आहे.
  • कुंभमेळ्यासाठी उत्तराखंड सरकारने ‘प्रोटोकॉल’ ठरविला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रलयानेही नियमावली जाहीर केली. कुंभमेळ्यासाठी येणाऱया भाविकांनी 72 तासांपूर्वीचा ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक असल्याचे म्हटले. पण कोणत्याच नियमांचे पालन होताना दिसत नाही.
  • सोमवारी शाही स्नानासाठी तब्बल 31 लाख भाविक, साधुंनी गंगेत डुबकी घेतली. एवढय़ा प्रचंड संख्येने लोक एकत्र आले. ना मास्क होता, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले. सोमवारी 349 कोरोना रुग्ण आढळल्याचे हरिद्वारच्या आरोग्य अधिकाऱयाने सांगितले. पण ही संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे.
    • हरिद्वार, डेहराडून आणि तिहारी हे तीन जिल्हे कुंभक्षेत्र आहेत. तिन्ही जिह्यांच्या सीमांवर चाचणी केंद्र उभारली; पण लाखोंची चाचणी कशी करणार? हा प्रशासनापुढे मोठा प्रश्न आहे.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.