चाकण येथे महिलेच्या पहिल्या पतीने केला पत्नीचा खुनाचा प्रयत्न, आरोपी पतीला अटक

पिंपरी चिंचवड : महिलेच्या पहिल्या पतीने त्याला व मुलाला सोडुन दुसरे लग्न केले या कारणावरून तिला शिवीगाळ करत खाली पाडुन छातीवर पोटावर उडया मारून त्याचे कमरेच्या पटटयाने मारहाण करत डोके जमिनीवर आपटत कमरेच्या पटयाने गळा आवळुन तिस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना  १२ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास मौजे चाकण गावच्या हद्दीत खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

 

काजल पप्पु सोवसीया (वय २७ वर्षे धंदा गृहिनी रा. खंडोबामाळ चाकण ता. खेड जि. पुणे)  जखमी महिलेचे नाव असून त्यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तर गोपाळ अशोक खारवा ( रा. चोरबाजार, दोन टाकी मज्जीत बंदर जवळ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे आरोपी गोपाळ याच्या बरोबर लग्न झाले होते.सुमारे आठ महिण्यापुर्वी फिर्यादीनी पहिल्या पती गोपाळ खारवा यांच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर फिर्यादी या त्यांचा दुसरा पती पप्पु मंजी सोवसीया याचे बरोबर खंडोबामाळ चाकण येथे राहत होत्या.१२ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी काजल सोवसीया या घरात एकटीच असतांना पहिला पती गोपाळ खारवा हा आला व त्याने त्याला व मुलाला सोडुन दुसरे लग्न केले तसेच त्याचे बरोबर पुन्हा राहण्यास येत नाही या कारणावरून शिवीगाळ करत फिर्यादीस खाली पाडुन छातीवर पोटावर उडया मारून त्याच्या कमरेच्या पटटयाने मारहाण करत डोके जमिनीवर आपटत कमरेच्या पटयाने गळा आवळुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा फिर्यादी बेशुध्द पडल्याने त्यांना अॅम्ब्युलन्स मध्ये घालुन डी.वाय.पाटील हॉस्पीटल पिंपरी येथे औषधोपचारासाठी नेले होते.

फिर्यादी काजल या शुध्दीवर आल्यावर तीचा जबाब नोंदवुन चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी गोपाळ हा गुन्हा केल्यानंतर मुंबई येथे पळुन गेल्याची माहिती होती. त्यास मुंबई येथुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस
निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, विजय जगदाळे, पोहवा राजकुमार रेंगडे, पोना संदिप सोनवणे, पोकॉ अशोक दिवटे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक, प्रकाश राठोड हे करीत आहेत.

 

 

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.