देशी दारूची अवैध वाहतुक करणा-या एकाला अटक ३.४९ लाखाचा मुददेमाल जप्त

पिंपरी चिंचवड : देशी दारूची अवैध वाहतुक करणा-या एकाला चाकण पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ४९ हजार ९२० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

रतन मदन बागडे (वय ४५ वर्षे रा. भाटनगर, पिंपरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचा विरोधात चाकण पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी गावच्या हददीत नाशिक पुणे हायवे रोडवर आळंदी फाटा येथे देशी दारूची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचुन चाकण बाजुकडुन येणारे एक चॉकलेटी रंगाची मारूती सुझुकी कंपनीची वॅगेनर कार (नं. एम एच १४ ई यु ७५९६)पोलिसांनी पकडली.सदर कारमध्ये पोलिसांनी बघितले असता कारमध्ये टॅगो पंच देशी दारू असलेले एकुण २० बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये १८० मिली दारूच्या ४८ बाटल्या असलेल्या अशा एकुण ९६० सिलबंद बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत ५२ रू. असलेली असा देशी दारूचा एकुण ४९ हजार ९२० रुपये किंमतीचा माल मिळुन आला असुन दारू वाहतुक करण्यासाठी वापरलेली बॅगेनर कार (नं.एम एच १४ ई यु ७५९६) ही ताब्यात घेण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये पोलिसांनी ३ लाख ४९ हजार ९२० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उप निरीक्षक, विजय जगदाळे, पोहवा सुरेश हिंगे, ऋषीकेश झनकर, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, अनिल गोरड, पोलीस शिपाई, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, मनोज साबळे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.फौ. वाघुले हे करीत आहेत.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.