धक्कादायक! पत्नीने गर्भपाताच्या गोळ्या न खाल्ल्याने तिला बेदम मारहाण ; पोटातच गर्भाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड: गर्भपात करण्यासाठी पत्नीला गोळ्या दिल्या. पत्नीने गोळ्या न खाल्ल्याने तिलाा बेदम मारहाण केली.त्यात पत्नीच्या पोटातच गर्भाचा मृत्यू झाला. हा प्रकार च-होली बु. चोविसावाडी येथे ऑगस्ट 2019 ते 18 मार्च 2021 या कालावधीत घडला.याप्रकरणी पतीसह त्याच्या आई वडीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतन राजू तापकीर (वय २८), सुशीला राजू तापकीर (वय ४६), राजू सुदाम तापकीर (वय ५८, सर्व रा. आळंदी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी घरातील कामे करत नाही. जेवण बनवता येत नाही, कचरा व्यवस्थित साफ करत नाही, अशा कौटुंबिक कारणावरून भांडण करून आरोपींनी शिवीगाळ केली. पती केतन तापकीर याने गर्भपात करण्यासाठी पत्नीला डॉक्टरकडे नेऊन गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या नाहीत. म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. मूल जिवंत जन्माला न येण्याच्या उद्देशाने पत्नीला हाताने मारहाण करून भिंतीवर आपटले. मुलाला जन्म कशी देतेस ते बघतो, अशी दमदाटी केली. या प्रकारामुळे रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दिघी पोलीस तपास करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.