पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; ‘सकाळी ७ ते सायंकाळी ६’पर्यंत सुरू राहणार अत्यावश्यक सेवा

पुणे : राज्यात  कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची  संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संचारबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील कोरोना प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी सुधारित आदेश जारी केले.

काय आहेत सुधारित आदेश?

 • पुणे महापालिका क्षेत्रात आज (१४ एप्रिल २०२१) सायंकाळी ६ पासून ते १ मे २०२१पर्यंत संचारबंदी
 • नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय / अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध.
 • अत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत सुरु राहतील.
 • घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस, नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रावी १०.०० वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ सेवांचा समावेश 

 • रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण ( Vaccinations ), वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरन युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणाऱ्या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा.
 • पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र , पाळीव प्राणी खाद्याची दुकाने
 • भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने
 • शीतगृह आणि गोदाम सेवा
 • सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा
 •  स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा
 • रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या
 • सेवा सेबी तसेच सेबीची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये
 • पूर्व पावसाळी नियोजित कामे
 • वेगवेगळ्या देशांचे राजदूत यांची कार्यालये
 • दूरसंचार सेवा आणि त्याच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी)
 • ई – कॉमर्स ( अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी)
 • मान्यता प्राप्त मिडिया
 • पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणान्या सेवा
 • सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा
 • डेटा सेंटर । क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित
 • पायाभूत सुविधा आणि सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
 • विद्युत व गॅस वितरण सेवा
 • विद्युत व गॅस वितरण सेवा
 • एटीएम
 • सर्व प्रकारचे आयात-निर्यात
 • कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते उपकरणे)

काय सुरु काय बंद?

 • वर्तमानपत्रांचं प्रकाशन आणि वितरण केलं जाऊ शकतं. वर्तमानपत्राशी निगडीत व्यक्तींनी लवकरात लवकर लस घ्यावी.
 • सिनेमागृहं, नाट्यगृहं आणि सभागृहं बंद राहतील. अम्यूजमेंट पार्क, आर्केड, व्हीडिओ गेम पार्लर बंद राहतील.
 • वॉटर पार्क , क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
 • चित्रपट, मालिका, जाहिरातीचं चित्रीकरण थांबवण्यात येईल.
 • दुकानं, मॉल, शॉपिंग सेंटर्स जे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत नाहीत ते बंद राहतील.
 • समुद्रकिनारे, बगीचे, खुल्या जागा बंद असतील.
 • धार्मिक केंद्र बंद असतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद असतील.
 • शाळा, महाविद्यालयं बंद असतील. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत देण्यात येईल.
 • सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील.
 • कोणत्याही स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाही.
 • लग्नाला केवळ 25 जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे.
 • अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.