महाराष्ट्र गॅसवर, ऑक्सिजनसाठी ‘हा’ प्रयोग करणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

जालना : राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  कोरोना रुग्णांच्या  वाढत्या संख्येमुळे बेड उपलब्ध होत नसल्याचं चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. अशातच कोरोना रुग्णांना रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासू लागल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याच समोर आल आहे. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून आता सरकार हवेतून ऑक्सिजन घेवून रुग्णालयांना पुरवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असल्याच बोललं जात आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातही ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळं कोणतंही राज्य ऑक्सिजन द्यायला तयार नाही.  जालन्यात टोपे यांच्या हस्ते रेमडिसिवर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. त्यामुळं हवेतला ऑक्सिजन घेवून तो प्युरिफाईड करून नंतर रुग्णालयांना पुरवणार असल्याची महत्वाची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान आज पासूनच्या ब्रेक द चेनच्या नियमांचे पालन करून जनतेने सरकारला सहकार्य करावे, अशी  विनंती देखील त्यांनी केली. सदर प्रयोग यशस्वी झाला तर राज्यभरात हा प्रयोग राबवणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.दरम्यान आज पासूनच्या ब्रेक द चेनच्या नियमांचे पालन करून जनतेने सरकारला सहकार्य करावे, अशी  विनंती देखील त्यांनी केली.

पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. आजपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला ‘ब्रेक द चेन’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळ्या पूर्वीची कामं सर्व सुरु राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुंबई विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण- 89,125

ऑक्सिजची गरज- 204 मेट्रिक टन

ऑक्सिजनचा पुरवठा- 62 मेट्रिक टन

नागपूर विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण- 87,344
ऑक्सिजनची गरज- 188 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 100 मेट्रिक टन
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात आवश्यकता असतानाही पुरवठा नाही.

नाशिक विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण- 75,770
ऑक्सिजनची गरज- 182 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 186 मेट्रिक टन

पुणे विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण – 1,32,910
ऑक्सिजनची गरज- 294 मेट्रिक टन
ऑक्सिजन पुरवठा- 578 मेट्रिक टन

औरंगाबाद विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण- 64,157
ऑक्सिजनची गरज- 142 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा – 151 मेट्रिक टन
यापैकी जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आवश्यकता असतानाही पुरवठा नाही.

अमरावती विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण – 20,142
ऑक्सिजनची गरज- 47 मेट्रिक टन
आवश्यकता असताना काहीच पुरवठा होऊ शकला नाही.

 

कोकण विभाग

अॅक्टिव्ह रुग्ण- 95,261 (यापैकी एकट्या ठाणे जिल्ह्यात 75 हजार रुग्ण)
ऑक्सिजनची गरज- 211 मेट्रिक टन
ऑक्सिजनचा पुरवठा- 394 मेट्रिक टन
दोन दिवसांपूर्वी ठाण्यात ऑक्सिजन संपल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते.

संपूर्ण राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण 5 लाख 64 हजार आहेत. त्यांना ऑक्सिजनची गरज- 1278 मेट्रिक टन इतकी आहे. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा 1481 मेट्रिक टन होतोय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने आता छत्तीसगडमधील भिलाई, कर्नाटकमधील बेल्लारी आणि हैदराबादमधून ऑक्सिजन मागवायला सुरुवात केलीय. मात्र त्याचाही मर्यादित पुरवठा आहे. मात्र वाहतुकीच अंतर लक्षात घेता तिथेही अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.