मोठी बातमी ! सीबीएससीच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नवी दिल्ली : सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्याा परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्याा परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.४ मे ते १४ जून दरम्यान सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा होणार होत्या. दहावीच्या ४ मे ते १४ मेच्या दरम्यानच होणार होत्या. यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल यापूर्वी झालेल्या परिक्षांच्या आधारावर देण्यात येणार आहेत. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती..
जर एखाद्या विद्यार्थ्याला देण्यात आलेले मार्क्सवर त्याचा आक्षेप असेल, तर तो पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्यावर परीक्षा देऊ शकतो. बारावीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. १ जूनपर्यंत कोरोनाची काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतल्यानंतर सीबीएससी बोर्ड परीक्षांवर पुढील निर्णय घेणार आहे.
जर बारावीच्या परीक्षेची पुढील तारीख ठरवण्यात आली, तर त्या परिक्षेच्या तारखेच्या १५ दिवस आधी वेळापत्रक दिले जाईल, ते सर्वांना १५ दिवस आधी कळवलं जाईल. ११ राज्यांमध्ये सीबीएससीच्या शाळा या पूर्णपणे बंद आहेत. इतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या निर्णयानंतर परीक्षांबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तारीख अद्याप सांगितली नसून लवकर तारीखही सांगण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!