रा.स्व.संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 

पिंपरी चिंचवड :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लागू असल्याने काही मोजक्या च कार्यकर्त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अभिवादन केले.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, समरसता प्रमुख महेंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.आंबेडकर जयंती निमित्त दरवर्षी संघाच्या समरसता विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम, व्याख्यान, उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते परंतु सध्या असलेल्या विविध निर्बंधामुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आभासी पद्धतीने काही व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.