वारजे माळवाडी परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गंग्या कारागृहात स्थानबद्ध

पुणे: वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय २४, रा. वारजे माळवाडी ) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गंग्या उर्फ विकी सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षांत त्याच्याविरूद्ध  खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहनांची तोडफोड, शस्ज्ञ बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार देण्यास नागरिक घाबरत होते.

त्यामुळे वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी गंग्याच्या विरोधात एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सराईत गंग्याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संघटीत गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार मागील सात महिन्यांत 19 गुन्हेगारांविरूद्ध एमपीडीए अ‍ॅक्टनुसार कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.