इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील घटना
पुणे :फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधू शकतो. पण याच माध्यमाचा वाईट अनुभव देणारी घटना घडली आहे पुण्यातील कात्रज परिसरात. सुखसागर भागात राहणार्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 13) उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला.
अक्षय साबळे (रा. दत्तनगर, कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अक्षय या दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर झाली. त्यानंतर ते दोघे सतत एकमेकांना बोलत असायचे. संवादातून आरोपीने अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केला. मंगळवारी (१३ एप्रिल) दुपारी तरुणीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसला. तरुणी एकटीच असल्याचं पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. पीडित तरुणीची आई घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेतला असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!