संचारबंदीमुळे लोककलावंत,नाट्य व चित्रपट कलावंत यांच्यावर येणार उपवसमारीची वेळ

 

मुख्यमंत्री साहेबांनी कलावंतांच्या पोटावर मारू नये – बाबासाहेब पाटील (प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

मुंबई :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची संचारबंदी कायम केली असून या संचारबंदी अंतर्गत विविध क्षेत्रातील कामे पूर्ण बंद केली आहेत. त्यापैकीच कला क्षेत्रात काम करणार्‍या कलावंतांना सुद्धा या पंधरा दिवसाच्या संचारबंदीचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या मार्च पासून कोविडमुळे आधीच लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे,तर चित्रपट निर्मिती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तर अनेक वर्षापासून लोककलावंत,व नाट्य चित्रपट क्षेत्रावर ज्या लोकांची हातावरच पोट आहेत अशा लोकांना कामावर गेल्याशिवाय त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही अशी स्थिती असताना दर वेळी प्रमाणे प्रत्येक वेळेस संचारबंदीत लोककलावंत,चित्रपट व नाट्यकलावंत यांनाच या लॉकडाऊनचा फटका का सहन करावा लागतो हाच मोठा प्रश्न आहे.

कोरोना ने मरण नंतर येईल मात्र उपासमारीने मरण आधी येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे,गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाउन मध्ये ना आर्थिक मदत झाली ना अन्नधान्याची मदत झाली या ही वर्षी याच पद्धतीने नियोजन शून्य कारभार चालू असल्याचे स्पष्ट दिसत आहे असे स्पष्ट मत सर्व कलाकारांचे आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावामुळे ब्रेक द चेन( लॉकडाऊन )लावला असून, अनेक क्षेत्राला आपण सूट दिली आहे,तसेच आर्थिक अनुदान व रेशन देऊ केले आहे.मात्र गेल्या मार्च २०२० पासून सरकारने कलाकार,लोककलावंत ,तंत्रज्ञ यांना काहीही मदत केली नाही किंवा आर्थिक पॅकेज दिले गेले नाही. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या सुरुवातीला प्रयोग,शूटिंग,कार्यक्रम बंद केले व अनलॉकच्या काळात सर्वात शेवटी शूटिंगला अनेक निर्बंध घालत परवानगी दिली.आता ही १५ दिवसाचा लॉक डाऊन लावला आहे ज्यात शूटिंग, लोककलावंताच्या कार्यक्रमांना आणि नाटकाच्या प्रयोगाला बंदी घालण्यात आली आहे,तर कलाकारांनी जगायचे कसे…? देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीचा भाग असणारे, राज्यासह देशाला सर्वात जास्त कर देणाऱ्या इंडस्ट्री चा घटक असणारे हे कलाकार ,मग या सर्व स्थरातील कलाकारांवर सतत अन्याय का ..? काय फक्त कलावंत हा घटक कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत आहे का ..? अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सारखे ४५ हजारांच्यावर सभासद संख्या असणाऱ्या संस्थेने देखील यासंदर्भात अद्याप कुठल्या प्रकारची भूमिका का घेतली नाही? असा संतप्त सवाल यावेळी बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे. लॉकडाऊनच्या काळात कमी युनिट मध्ये कोविड चे नियम पाळत शुटिंग ला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.