कोल्हापुरात मुलाला मिठीत घेऊन आई-वडिलांनी नदीत उडी मारून केली आत्महत्या

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज (शुक्रवार)सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. कळे परीसरात शोककळा पसरली आहे.  जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली आहे.

दिपक शंकर पाटील (वय-40), वैशाली दिपक पाटील (वय-35), विघ्नेश दिपक पाटील (वय-13) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह गोठे येतील कुंभी नदीपात्रात सापडले. आई आणि वडिलांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलाला घेऊन नदी पात्रात उडी मारुन ही आत्महत्या केल्याचे सकाळी उडकीस आली. हे दाम्पत्य गुरुवारी रात्री 11 नंतर घराबाहेर पडले होते.

पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील पाटील हे दाम्पत्य दोन मुले, वडील असे पाचजण एकत्र राहत होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्याने कुंभी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली. नदी पात्राजवळ तिघांनी एकत्र दोरीने बांधुन घेतले. सकाळी त्यांच्या घराला बाहेरून कडी अल्याचे दिसून आल्यानंतर शेजाऱ्यांनी घर उघडले. त्यावेळी त्यांना मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कुंभी नदीपात्राजवळ त्यांच्या चपला सापडल्या. गावकऱ्यांनी त्यांचा नदीपात्रात शोध घेतला असता तिघांचे एकत्र दोरीने बांधलेले मृतदेह आढळून आले.

सकाळी ९ च्या सुमारास मृतदेह  नदीपात्रातुन  बाहेर काढण्यात आले. या  दाम्पत्याची इ. १०  वीच्या वर्गात  शिकत असणारी कन्या साक्षी दिपक पाटील ( वय १६ )  ही आपल्या आजोळी  चिंचवडे ( ता. करवीर ) गावी गेल्याने या घटनेतुन वाचली असल्याची चर्चा गावक-यात होती.

जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या

जीवनात अयशस्वी  ठरलो, आम्हाला  माफ करा, कोणालाही जबाबदार धरु नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजु, आक्का, अमर, आण्णाला  सांभाळा. कोणीही  तक्रार  करु नये, मी, वैशाली व  विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्ज्यादा व दिपक, माफ करा, चुकलो. अशा मजकुराची  चिठ्ठी घरी मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.