खाऊचे आमिष देऊन व अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सातारा :  खाऊचे आमीष देऊन व अश्लील व्हिडिओ दाखवून एका सहा वर्षीय मुलीवर सहा जणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील जावळी तालुक्यात समोर आली आहे.याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी केडांबे (ता. जावळी) येथील सहापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने जावळी तालुक्यात खळबळ माजली असून जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अनिकेत उर्फ कृष्णा रामचंद्र ऊर्फ रामजी सुतार, रामचंद्र ऊर्फ रामजी कोंडीबा ऊर्फ बबन सुतार, साहिल राजू ओंबळे, लक्ष्मण कोंडीबा ऊर्फ बबन सुतार (माईचे दादा), रवींद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओंबळे (केडांबे, ता. जावली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,एप्रिल मे 2020 पासून ते 17 मार्च 2021 वेळोवेळी अनिकेत याने रहाते घरातील माळ्यावर, रामचंद्र ऊर्फ रामजी कोंडीबा ऊर्फ बबन सुतार याच्या शेतात असलेल्या वैरणीच्या गंजी जवळील झोपडीत, साहिल राजू ओंबळे याचे राहते घरात, लक्ष्मण कोंडीबा ऊर्फ बबन सुतार (माईचे दादा) याचे घरातील खोलीत, रवींद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओंबळे याचे राहते घरात बेडवर संबंधित अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे फिर्यादीत करण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिकेत उर्फ कृष्णा रामचंद्र ऊर्फ रामजी सुतार हा अद्याप पाेलिसांना सापडलेला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी शितल खराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.