चिखलीत फळ विक्रेत्यांकडून पोलिसांना मारहाण, दोघांना अटक 

पिंपरी चिंचवड :राज्यातील वाढता करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली संचारबंदी आणि कडक निर्बंध  संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. या संचारबंदी कलम अंतर्गत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सुरू ठेवलेल्या आस्थापनावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. चिखलीत शुक्रवारी (दि.16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

मोहम्मद इरफान अब्दुल हन्नान बागवान (वय 24, रा. राजवाडा चिखली) व मोहम्मद इम्रान अब्दुल रहमान शेख (वय 22, रा. राजवाडा चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, दोन विधी संघर्षित बालक आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक दिपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी (दि.14) रात्री आठपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सायंकाळी सहा नंतर अत्यावश्यक वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता अटक आरोपी फळ विक्रेत्यांनी पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.