केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : संपूर्ण देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात आहे. त्यानंतर 1 एप्रिलपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. आता देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यानंतर आता 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. यासंदर्भात सातत्याने देशात मागणी केली जात होती. आता हिच मागणी केंद्राने मान्य केली आहे. यामुळे देशातील कोरोना लसीकरणाला वेग आणखी वाढणार आहे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

देशात  लसीकरणाचा तिसरा टप्पा 

कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. मोदींनी यावेळी कोरोना टियर 2 आणि टियर 3 मधील शहरांमध्ये वाढत असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.

 

भारतात अतापर्यंत 12.38 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 18,37,373 सत्राद्वारे लसीच्या 12,38,52,566 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 91,36,134 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 57,20,048 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,12,63,909 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा), 55,32,396 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 4,59,05,265 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 40,90,388 (दुसरी मात्रा ), 45 ते 60 वयोगटातल्या 4,10,66,462 ( पहिली मात्रा ) आणि 11,37,964 (दुसरी मात्रा )  यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 59.42%  मात्रा आठ  राज्यात देण्यात आल्या आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.