खळबळजनक ! पुण्यात भारतीय सैन्यातील ब्रिगेडियरची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या, नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पुण्यात भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडालीय.ही घटना काल दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. ते एएफएमसी हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते

अनंत नाईक असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते पुण्यातील एएफएमसीमध्ये ब्रिगेडियर (हेड ऑफ द डिपार्टमेंट, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन) पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे नाईक हे आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सरकारी गाडीतून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते.

अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी होते. आज सकाळी ते सरकारी गाडी आणि चालकासह पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते. ते ड्रायव्हर बोडके यांना मी एमसीओ मधून जाऊन येतो असे सांगून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गेले.त्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी उद्यान एक्सप्रेस गाडीचा इंजिन पुढे झोकून देऊन आत्महत्या केली. ही घटना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली

त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येची माहिती मुलगा अभिषेक नाईक याना कळवली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाईक प्लॅटफॉर्म नंबर एक याठिकाणी फिरत असताना दिसत होते. त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.

आत्महत्येप्रकरणी एक प्रत्यक्ष साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेजही मिळालं

ब्रिगेडियर नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याचं नाव संतोष कांबळे असून तो व्यवसायाने पाणी पुरवठ्याचं काम करतो. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत ब्रिगेडियर नाईक हे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही, असं सीसीटीव्हीत दिसतंय.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी स्वतः घटनास्थळाला, AFMC office आणि त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. ते स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.