टेम्पो चोरीस गेल्याचा बनाव करणाऱ्यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

थेऊर : केसनंद येथे उभा असलेला टेम्पो ट्रक चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशा भुल करणाऱ्या एका व्यक्तीला लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करून त्यांचेकडून टेम्पो ताब्यात घेतला आहे.त्याचेकडून तीन लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा आश्यर टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

हरीश प्रसाद शर्मा (वय ३३, रा. धार, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास टेम्पोला भाडे मिळावे यासाठी मॅनेजर निलेश याने कळविल्यामुळे हरीश शर्मा इंदापूर येथून वाघोली येथे टेम्पो (क्र. एमपी-४१ जीए०७२१) घेऊन आला. दरम्यान शर्मा हा वाघोली येथे टेम्पो घेऊन आल्यानंतर केसनंदकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला लावून जेवण करून कॅबीन झोपी गेला. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास टेम्पोला लॉक करून शर्मा हा टॉयलेटला गेला. टॉयलेटवरून आल्यानंतर त्याठिकाणी टेम्पो नसल्यामुळे कोणीतरी टेम्पो नेला अशी तक्रार लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल केली. शर्मा याचे तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

लोणीकंद तपास पथकाने फिर्यादी व त्याचा मॅनेजर यांचेकडे बारकाईने चौकशी केली. वाघोली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले परंतु अशाप्रकाची कोणतीही गाडी केसनंद फाटा, वाघोली येथे आली नसलेबाबत प्रथमदर्शी पोलिसांच्या लक्षात सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तपास पथकाच्या वेगवेगळ्या टीम बनवून तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वेगवेगळे पथक तपास करत असताना दिनांक १७ एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या तपास पथकाचे बाळासाहेब सकाटे व पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे यांना पुणे ते सोलापूर महामार्गावर एच.पी. पेट्रोलपंप जवळ रोडच्याकडेला गुन्ह्यातील टेम्पो लावलेला दिसून आला. सदर टेम्पोबाबतची खात्री करून टेम्पो ताब्यात घेतला. परंतु टेम्पो कुठेही सीसीटीव्ही फुटेजमधे आला नसल्याने तसेच फिर्यादीने सांगितलेल्या माहितीमध्ये तफावत येत असल्याने तपास पथकाचा फिर्यादी हरीश शर्मा याचे विरुद्ध संशय बळावला. फिर्यादी शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असतात फिर्यादीच आरोपी असल्याचे उघड झाले. आरोपी हरीश प्रसाद टेम्पो चोरीस गेलेला नसताना चोरीस गेला असल्याचे भासवून पोलिसांची फसवणूक केल्याने त्यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शर्मा याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचेकडून गुन्ह्यातील ३ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा आश्यर टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

सदर कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त, नामदेव चव्हाण, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सागर कडू यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.