चारचाकी वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, १७.३० लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी चिंचवड : चारचाकी वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगारास वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४ वाहनचोरी गुन्हे उघड आणून १७ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राजु बाबुराव जावळकर (वय ५५ वर्षे रा. मुपो खानापुर ता. हवेली जि पुणेे ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हयांना उघडकिस आणण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यानी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वाकडं पोलिस ठाण्यातील शोध पथकाच्या पोलीसांनी रेकॉर्डवरील घरफोडी व वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांना चेक करुन चारचाकी वाहनचोरी झालेल्या परीसरातील १०० पेक्षा जास्त C.C.T.V. फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी राजु यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास पोलिसांनी केला.

त्याच्याकडुन ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा अशोक लेलड कंपनीचा टेंपो (MA14/EM/5597) व ३ लाख रुपये किमतीचा अशोक लेलड कंपनीचा टेंपो (क्र MH14/GDI8114) हि चोरलेली वाहन हस्तगत करण्यात आली असुन १ लाख रुपये किमतीचा ट्रक (क्र MH20/CT/6537) या वाहनाची बॉडी व केबीन हस्तगत करण्यात आली आहे. तसेच आरोपीने गुन्हा करतेवळी वापरलेली ४ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो व ५ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ अशी एकुण १७ लाख ३० हजार रूपये किमतीची वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे ,सहा.पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे – १ संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे -२ सुनिल टोणपे,  संतोष पाटील, सपोनि  अभिजीत जाधव,  पोउनि सिद्धनाथ बाबर व पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, बापुसाहेब धुमाळ, अतिश जाधव, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेगंजे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, शाम बाबा, कौंतेय खराडे, सुरज सुतार, सचिन नरुटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.