काय रे कोठे चाललाय’ असे विचारल्याने सहा जणांच्या टोळक्याने केला २४ वर्षीय तरुणाचा खून

पिंपरी चिंचवड :’काय रे कोठे चाललाय’ असे विचारल्याने सहा जणांच्या टोळक्याने सोमवारी (ता. १९) रात्री पावणे नऊच्या सुमारास २४ वर्षीय तरुणावर चॉपर व कोयत्याने वार केले.ही घटना निगडीतील ओटा स्कीम येथे घडली. यामध्ये गम्भीर जखमी झाल्याने आकाश यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार टोळी युद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे.

आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय 24, रा. भीमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत भरत दिलीप लोंढे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सोहेल संतोष जाधव (वय 18), हेमंत खंडागळे (वय 18), गणेश धोत्रे (वय 18), यश उर्फ गोंदया खंडागळे (वय 19), वैभव वावरे (वय 21), श्रवण कु-हाडे (वय 18, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल याला मयत आकाश याने ‘काय रे कोठे चाललाय’ असे रागात विचारले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी ओटास्कीम येथे अण्णाभाऊ वासहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी आणि मयत आकाश बोलत थांबलेले असताना तिथे आले. आरोपींनी आकाशला पकडले. सोहेलने लोखंडी चॉपर आकाशच्या पोटात खुपसला. गणेश धोत्रे याने कोयता उगारून शिवीगाळ केली तसेच परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेले.

सुरुवातीला या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार टोळी युद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.