खंडणी गुन्ह्यातील फरार सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : खंडणी गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.श्रीराम उर्फ बापू जगन्नाथ माने (वय 32, रा. माळेगांव, ता. बारामती जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहिती वरून आरोपी  श्रीराम  यास माळेगांव येथे सापळा रचून पकडले असता तो मंचर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात १ वर्षा पासून फरार असल्याचे माहिती मिळाली यावरून खात्री करून आरोपीस पुढील तपास कामी मंचर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलिस अधिक्षक  मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , पो हवा/कोकरे ,पो हवा/काळे,पो ना/एकशिंगे , पो ना/कांचन ,पो कॉ/जाधव यांनी केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.