देशव्यापी लॉकडाऊनचा प्रश्न येत नाही, राज्यांनी लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाची  परिस्थिती बिकट होत असल्यामुळे राज्यात संपूर्णपणे लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. याबद्दल राज्य सरकारची पूर्ण तयारी झाली असताना दुसरीकडे देशात लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच येत नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. “देशव्यापी लॉकडाऊनचा प्रश्न येत नाही. राज्यांनी देखील लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे”, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.मोदींनी बोलायला सुरुवात करण्याआधी जी लोकं या कोरोना महामारीत मारले गेले त्या सगळ्यांना आदरांजली वाहिली. इतकचं नाही तर, डॉक्टर, नर्स, सगळे आरोग्य कर्मी, पोलीस या सगळ्यांनी कोरोना काळात जी कामगिरी केली त्याचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेशी संवाद साधला आहे. ह्यावेळी देशव्यापी लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी सरकारची भूमिका मांडली आहे

‘मागील वर्षी आपण लॉकडाऊन लावला होता, त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे, राज्य सरकारने सुद्धा लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडला पाहिजे’, असं आवाहनही मोदींनी केले.

‘या संकटाच्या वातावरणात गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढ यावे, लोकांच्या मदतीतून आपण कोरोनावर मात करू शकतो. तरुणांनी आपल्या सोसायट्यांमध्ये येऊन समिती स्थापन करून कोरोनाचे नियम पाळण्याबद्दल जागृकता करावी. जर आपण सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही’, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

* देशात लॉकडाऊनची आवश्यकताच नाही
* देशव्यापी लॉकडाऊनचा प्रश्नच येत नाही. ह्या काळात जबाबदारीने वागावे.
* आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे.
* राज्यांनाही विनंती आहे की लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावे
* आपल्या लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजून द्यावे.
* देशभरात सध्या ऑक्सिजन मागणी प्रचंड प्रमाणात आहे. ऑक्सिजन साठा वाढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
* गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लढाई आणखी मजबूत करण्याची आवश्यकता
* औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जात आहे.
* औषधनिर्मितीचे प्रमाण वाढवले आहे.
* भारतात जगातील सर्वात स्वस्त लस, आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे.
* जगातील सर्वाधिक वेगाने लसीकरणाची मोहीम देशात सुरू.
* आजपर्यंत देशभरात १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण
* आधीच्या स्थितीत आपल्याकडे कोरोनासंबंधी कोणतीही आरोग्यविषयक माहिती नव्हती.
* आज ह्या स्थितीत सुधारणा. अनेकांचे आयुष्य वाचवले जात आहे.
* आपण मजबुतीने कोरोनाविरुध्दची लढाई लढली आहे.
* अर्थचक्र आणि उद्योगविश्व सुरू राहील असाच आमचा प्रयत्न
* आपल्याकडे उपचार, लस, कोविड सेंटर्स आहेत. कमी काळात मोठी आरोग्ययंत्रणा उभारली.
* मजुरांनी आहे तिथेच थांबावं स्थलांतर करू नये

‘आता 18 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात जी लस तयार केली जाईल, त्याचा हिस्सा हा राज्य आणि रुग्णालयांना मिळणार आहे.  45 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू आहे. त्यांनाही लस देण्याची मोहीम सुरूच राहणार आहे’, असंही मोदींनी स्पष्ट केले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.