प्रवासी नागरिकांना बनावट कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, हिंजवडी पोलिसाची कामगिरी
पिंपरी चिंचवड : प्रवासी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या चौघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 19) दुपारी इंदिरा कॉलेज जवळ वाकड येथे उघडकीस आला.
पत्ताराम केसारामजी देवासी (वय 33, रा. भुमकर वस्ती, वाकड), राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय 25, रा. धनकवडी, पुणे), चिरंजीव (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील इंदिरा कॉलेज जवळ असणाऱ्या शनी मंदिरापाशी एक टोळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र पुरवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ( ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई केली.
त्यातील आरोपी राकेशकुमार वैष्णव हा बनावट कोरोना रिपोर्ट बनवून व्हाट्स अपवर पाठवत होता. हे रिपोर्ट वाकड येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांच्या मागणीनुसार दिले जात होते. रिपोर्टवर लाइफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड बावधान या लॅबचे बनावट लेटरहेड आणि डॉक्टरांचे बनावट सह्या व शिक्के आरोपी नमूद करत असत. हिंजवडी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!