मोठी बातमी ! राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, मुख्यमंत्री करणार घोषणा
मुंबई : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण, तरीही लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे, याबद्दलचा निर्णय झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) याबद्दल घोषणा करणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. ज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.
लॉकडाऊन अत्यंत कडक असला पाहिजे. गेल्यावर्षी जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तसाच हा लॉकडाऊन हवा. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन आवडीचा विषय नाही मात्र लॉकडाऊनशिवाय आज पर्याय देखील नाही. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल. राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाहीये. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. लॉकडाऊनबाबतच्या लवकरच जारी केल्या जातील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं.
तर, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी आपण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण, संसर्ग वाढतच असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे, 21 एप्रिलपासून रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबद्दलच्या निर्णयाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
काही करु लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन बाबत घोषणा करतील अशी माहिती राजेश टोपे यांनीही दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच
राज्यामध्ये 14 एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. एप्रिल महिना संपेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या कालावधीसाठीच्या नियमांमध्ये आज सकाळीच काही बदल करण्यात आले.
किराणा मालाची दुकानं, भाज्यांची दुकानं, फळविक्रीकेंद्र, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र (यामध्ये चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी, मासे विक्रेत्यांचा समावेश आहे), शेतमालाशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्नविक्री केंद्र, पावसाळी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक वस्तूविक्री केंद्र सकाळी 7 ते 11 या वेळेपुरतीच खुली राहतील.
या दुकानांमधून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच वस्तू पोहोचवण्याची सुविधा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये बदल करू शकतं.
आज रात्रीपासून सुधारित नियम लागू होतील. 1 मे पर्यंत नागरिकांना लॉकडाऊन नियमांचं पालन करायचं आहे.
स्थानिक आपात्कालीन यंत्रणा, राज्य आपात्कालीन व्यवस्थापनाच्या अनुमतीनंतर अत्यावश्यक सेवांमध्ये काही अतिरिक्त गोष्टींचा समावेश करू शकते.
नव्या नियमासह 13 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेले नियम तसेच कायम लागू होतील असं राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
अचानक लॉकडाऊन लागू केल्यास, गोंधळ निर्माण होऊ शकतो हे जाणून सरकारने यासंदर्भात घोषणा करण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला.
राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रदीर्घ लॉकडाऊन लावण्यात आला आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!