हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू ; रुग्णाच्या नातेवाईकांकडून वॉर्ड बॉय, स्वीपर, वॉचमन यांना मारहाण

पिंपरी चिंचवड : हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. या कारणावरून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय, स्वीपर आणि वॉचमनला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घडली.

सुरज कटारे, नागेश अवघडे, रामस्वामी राजल्ले, सुरज डेव्हिड, योगेश डेव्हिड, बंटी कटारिया यांच्यासह 25 ते 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. श्रीनिवास चाटे (वय ३१, रा. न्यू सांगवी)यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर अर्जुन कटारे (वय 28) या रुग्णावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यु झाला. हे समजताच हॉस्पिटलच्या आवारात त्याचा चुलत भाऊ सुरज कटारे व इतरांनी बेकायदा जमाव जमवून तेथील कार्यालयात शिरुन वॉर्ड बॉय ओंकार राजे, स्वीपर ऋषिकेश श्रीधर पिंजन, वॉचमन कुणाल वाघमारे यांना हाताने मारहाण केली. हॉस्पिटलच्या रुमची तोडफोड करुन शासकीय कामात अडथळा आणला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.