शिरूर गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी गणेश कुर्लप याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

शिरूर : शिरूर गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यानी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील फरारी असलेल्या आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार शिरूर तालुक्यात रामलिंग रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांना बातमी दारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक 26 रोजी सी.टी बोरा कॉलेज रोडवर मोटरसायकलवर येऊन प्रवीण गोकुळ गव्हाणे या युवकावर गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी  गणेश चंद्रकांत कुर्लप (रा.शिरूर जि.पुणे) हा रामलिंग रोड येथे येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यानी सापळा रचून गणेश चंद्रकांत कुर्लप याला रामलिंग रोड येथे अटक केली. सदर आरोपी पुढील कार्यवाही साठी शिरूर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड अमृतराव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे,पोसई रामेश्वर धोडगे,पोसई हनुमंत पडळकर,सहा.फौ दत्तात्रय गिरिमकर,पोहवा जनार्दन शेळके, पोना.राजू मोमीन, पो.ना अजित भुजबळ,पो.ना मंगेश थिगळे,पो.कॉ प्रसन्नजीत घाडगे,पो.ना दिनेश कुंभार,पो.कॉ प्रवीण पिठले,पो.कॉ विशाल कोथळकर,मपोका गव्हळी,पो.कॉ अरुण पवार यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.