एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली, परिमल सिंह नवे आयुक्त

मुंबई : भाजपला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा पुरवणाऱ्या ब्रुक फार्मा संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारने कारवाईचे पाऊल उचलले आहे.एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे बदली  करण्यात आली आहे. काळे यांच्यानंतर  परिमल सिंग यांच्याकडे एफडाए आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे.  रेमडीसीवीर इंजेक्शन्स प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन्स उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपला ५० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवठा करण्यासाठी ब्रुक फार्मा कंपनीने तयारी दर्शवली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ब्रुक फार्माच्या संचालक राजेश डोकानिया चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डोकानिया यांची सुटका केली होती.

काय आहे प्रकरण?

‘मुंबई पोलीसांकडे फार्मास्युटिकल कंपनीने मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर औषध साठवल्याची विशेष माहिती होती. भारत सरकारच्या रेमडेसीवीर या औषधाच्या निर्यातीवरील विद्यमान बंदीमुळे रेमडेसीवीर चा हा साठा निर्यात करता आला नाही. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी रेमडेसीवीर हे एक जीवनरक्षक औषध मानले जाते. विशेष माहितीनुसार, कारवाई करताना १७ एप्रिलला फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकास बीकेसी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलावले होते. बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक होते. एफडीएचे आयुक्‍त व सह आयुक्‍त यांनाही याची माहिती होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.