खळबळजनक ! अंबाजोगाईत ऑक्सिजन अभावी 5 रुग्णांचा मृत्यू ! नातेवाईकांचा आरोप

बीड : नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचं वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी सुक्रे यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे. आज ऑक्सिजन अभावी नाशिकात 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. या घटनेने राज्य सुन्न झालेले असताना आता अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहा करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे दिलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन आणि तीन या वार्डांमध्ये करोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वार्डातील ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं. अर्धा ते एका तासा दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती यासंदर्भात बोलताना स्वाराती रुग्णालयाच्या प्रशासनं दिली. ज्या रुग्णांचे मृत्यू झाले, त्यांना करोनाबरोबर सहव्याधी होत्या आणि रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती असंही न्यायालयानंही म्हटलं आहे.
ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होत असताना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावलाय. तसेच त्यांनी सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा केला आहे.
यावेळी पुढे स्पष्टीकरण देताना सुक्रे यांनी दिवसभरात उपचार करताना एकूण 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच, आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे 60 वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले रुग्ण आहेत, असेही सांगितले.

मृतांच्या अँटीजेन टेस्ट केल्याने संशय गडद

 स्वाराती रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटीव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. आजच्या घटनेतील मयत रूग्णांची मात्र घाईगडबडीत अँटीजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविल्याने प्रशासन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय गडद झाला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.