पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी अकरानंतर किराणा मालासह चिकन, मटण, आणि अंडी घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश

पिंपरी चिंचवड : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुकानांच्या वेळा बदलून सकाळी सात ते 11 अशी करण्यात आली आहे. घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत देता येणार आहे. सर्व मेडिकलची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत सुरू राहणार आहेत. याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी सुधारित आदेश..

१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी दिनांक १४.०४.२०२१ रोजीचा आदेशातील आवश्यक सेवा (Essential Category) मध्ये खालील नमूद दुकाने सकाळी ०७.०० ते ११.०० या वेळेतच सुरु राहतील.

सर्व प्रकारची किराणा माल (Groceries), भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने (फक्त क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा यांनी प्राधिकृत केलेली), चिकन, मटण, आणि अंडी विक्री करणारी दुकान कृषी संबंधित दुकाने आणि त्यांचेशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांचेशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी).
-पाळीव प्राणी खाद्याची दुकाने (Pet Shop).

पावसाळ्याच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने -उर्वरित आवश्यक सेवा (Essential category) या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील.

२) वरील नमूद सर्व दुकाने/आस्थापनामार्फत घरपोच पार्सल
सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०६.००
पर्यंत सुरु राहतील.

३) वरील नमूद दुकाने वगळता इतर बाबींसाठी इकडील दिनांक १४.०४.२०२१ व दिनांक १७.०४.२०२१ रोजीचे आदेश कायम राहतील.

४) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. केंद्र सरकार/महाराष्ट्र शासन/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार/राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदर आदेश दि.२०.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहिर केला आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.