‘तू इथे राहिलीस तर मारून टाकीन’, अशी धमकी देत सावत्र बहिणीचा विनयभंग

पिंपरी चिंचवड : कौटुंबिक कारणावरून सावत्र बहीण आणि भावामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामधून आई व बहिणीसोबत येऊन भावाने बहिणीला मारहाण करून ‘तू इथे राहिलीस तर तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिली तसेच बहिणीला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. . ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री आणि बुधवारी (दि. 21) दुपारी भीमशक्तीनगर, चिखली येथे घडली.

पीडित 34 वर्षीय महिलेने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयभिम भिका भालेराव (वय-३० वर्ष रा. भिमशक्तीनगर चिखली पुणे), त्याची आई व बहिण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी सावत्र भाऊ फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. बहिणीला अश्लील शब्दात बोलून त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर दगड फेकून मारला.

बुधवारी दुपारी तीन वाजता आरोपी सावत्र भाऊ त्याच्या बहीण आणि आईला घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. ‘हिला इथे राहू द्यायचे नाही. तिला येथून हाकलून द्या. तू जर इथे राहिलीस तर तुला जावे मारून टाकीन’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.