पुण्यात नायजेरियन व्यक्तीकडून ४ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पुणे परिसरातील कोंढव्यातून एका नायजेरियन व्यक्तीकडून तब्बल चार लाख रुपये किमतीचे कोकेन पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध  कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शमशुद्दीन ओमोटोला हसन (वय 48, रा.सांकला एक्सक्लुझिव्ह विस्ता सोसायटी, पिसोळी, मूळ लॅगोस, नायजेरिया) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना त्यांना वरील आरोपी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 52 ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.त्याच्या जवळील पाच मोबाईल फोन, एक दुचाकी, रोख 20 हजार रुपये आणि इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण पाच लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.