भिगवण येथे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे राज्यमंत्री भरणे यांचे हस्ते उद्घाटन

 

भिगवण (नारायण मोरे) :भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज व संख्या विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० ऑक्सिजनयुक्त बेड सुरु करण्यात आले आहेत याचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते दि.२१ रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आय़ुष प्रसाद, प्रभारी तहसलिदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन बोगावत, शंकरराव गायकवाड, रमेश धवडे, धनाजी थोरात,तुषार क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत खानावरे,सरपंच तानाजी वायसे, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ, नितीन काळंगे, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते व पत्रकार बंधू उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी येथील सेंटरची पाहणी केली व उपलब्ध सुविधाबाबत माहिती घेतली.व स्वच्छतेबाबत सूचनाही दिल्या.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापुर तालुक्यामध्ये सध्या १६६३ सक्रिय कोरोना रुग्न आहेत. रुग्नांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. भिगवण येथे ६६ आयसोलेशन बेड सुविधा आहे त्यामध्ये आत्ता १० ऑक्सिजन बेडची भर पडलेली आहे. भिगवण येथे टप्प्याटप्प्याने पन्नास ऑक्सिजनयुक्त बेडची सोय उपलब्ध करुन देऊ. येथील कोविड सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर व इतर स्टाफचीही नेमणुक केली आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण आहे नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागु केलेल्या निर्बंधाचे पालन करावे.तसेच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.