वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी /नियम/येणा-या अडचणी/त्यावर पर्याय

मुंबई :शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे, ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते. वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते. मयत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंदवहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम या यामध्ये रजिस्टर मध्ये नोंदवून वारसाची चौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. व नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी –

एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते.अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते. अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे.
नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात.हिंदू व्याकीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया/कार्यपद्धती –

सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यूनंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये घेतली जाते. व नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच,पोलिस पाटील,व प्रतिष्ठीत नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते. नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. नंतर किमान १५ दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते.

वारस नोंदीतील महत्वाच्या बाबी व्यक्तीने स्वतः कष्ट करून मिळविलेल्या जमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो. स्वकस्ताने मिळविलेल्या जमिनीत मयत व्यक्तीच्या वडिलाना कोणताही हक्क मिळत नाही. वडिलांच्या आगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना मिळून एक वाटा मिळतो.जर मयत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाही. परंतु त्यांना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.वारसांची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तहशीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय नोंदवहीत रकाना ७ मध्ये लिहिलेला असतो.

वारसाचे प्रमाणपञ –

आपण मयत व्यक्तीच्या नात्यातील आहोत व त्या व्यक्तीच्या मरणानंत त्याच्या संपतीवर अथवा स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे. हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखविता येते.वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे –विहित नमुन्यातील कोट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र
,मृत्यू प्रमाणपत्र ,तलाठी अहवाल / मंडळ अहवाल. शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.मयत व्यक्ती पेंशन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेंशन उचललेल्या पानाची झेरोक्स.शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड /कुपणाची झेंरोकस प्रत. ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाम लिहिलेला असल्याचा पुरावा.

वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी –

वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगेळे असतात.
बँक, विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम हि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.
वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती संबंध असलेल्या व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट, इ. बाबींसाठी महत्वाचे असते.

संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.