पिंपरी चिंचवड मधून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ‘डिजिटल पास’ गरजेचा, ‘या’ वेबसाईटवरून काढता येणार डिजिटल पास

पिंपरी चिंचवड :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच पिंपरी चिंचवड मधून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाण्यासाठी देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी पुणे पोलिसांनी covid19-mhpolice-in ची वेबसाईट तयार केली असून याद्वारे हे डिजिटल पास देण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात यासाठी डिजिटल पास कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सेवा देणार आहे.

नागरिकांना खालील अत्यावश्यक कारणासाठीच नमुद वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यास परवानगी राहील.

प्रवास करणा-या नागरिकांनी त्यांच्या ७२ तासांच्या आतील ते RAT/RTPCR निगेटीव्ह आलेबाबत प्रमाणपत्र सदर वेबसाईटवर सादर केले पाहीजे. नागरिकांना दिर्घकालावधीसाठी पासेस मिळणेस प्रतिबंध करण्यात आला असुन ०३ दिवसापेक्षा जास्त कालावधीनंतरचा परतीचा प्रवास असेल तर परतीच्या ठिकाणाच्या संबंधित प्राधिका-याकडे ई-पास साठी अर्ज करावा.

जवळच्या व्यक्तीचा मृत्यु /गंभीर आजार –

रक्ताचे नात्यातील व्यक्तीचा मृत्यु किंवा गंभीर आजाराबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र. सदर दस्तऐवज ई-पास साठी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सादर करावेत.

लग्न समारंभ-

अ) मॅरेज पार्टी – संबंधीतांकडुन परवानगी घेतली असल्यास रक्ताचे नात्यातील व्यक्ती वाहनाचे निम्म्या मर्यादेत प्रवासास करु शकतील. सोबत लग्नपत्रिका, परवाना, आमंत्रितांची नातेसंबंधांसह यादी इ. कागदपत्रे सोबत बाळगावीत व सदर दस्तऐवज ईपाससाठी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सादर करावेत.

ब) वैयक्तीक आमंत्रण – वैयक्तीक व्यक्ती लग्नासाठी उपस्थित राहणा-या २५ आमंत्रितांपैकी एक आहे हे सिध्द करणारे कागदपत्रे, तसेच नातेसंबंध सिध्द करणारी कागदपत्रे व लग्न पत्रिका सोबत बाळगावी व सदर दस्ताऐवज ई-पास साठी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सादर करावी.

आपत्कालीन व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक सेवेशी संबंधित व्यक्ती, अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणारे डॉक्टर, नर्स व आरोग्य विभागशी संबंधित व्यक्ती, कार्यालयीन कामकाजासाठी जिल्हयाबाहेर प्रवास करणारे सरकारी कर्मचारी इत्यादी नागरिकांनी त्यांच्या कर्तव्याचे ओळखपत्र व प्रवास करण्याच्या कारणाचे दस्ताऐवज सोबत बाळगल्यास त्यांना ई-पासची गरज लागणार नाही.

मालवाहक वाहनास ई पासची आवश्यकता नाही.

महत्वाचे कारण नसल्यास, अपुर्ण तपशिल, अवैध कागदपत्र निवडलेल्या अत्यावश्यकतेशी कागदपत्र संबंधित नसल्यास, अपुर्ण किंवा अपुरे कागदपत्र, फोटो अस्पस्ट असल्यास, पुर्वी पास दिला असल्यास व अधिकार क्षेत्राबाहेर असल्यास ई-पास देण्यात येणार नाहीत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ई-पास हेल्पलाईन नंबर 9529691966 वर संपर्क करावा.
.
.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.