विरार रुग्णालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

विरार : राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत.  अतीदक्षता विभागास आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आयसीयू वॉर्डात भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसा, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण ३९ रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

मृतांची नावं :

 

उमा सुरेश कनगुटकर
निलेश भोईर
पुखराज वल्लभदास वैष्णव
रजनी आर कडू
नरेंद्र शंकर शिंदे
जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
कुमार किशोर दोशी
रमेश टी उपयान
प्रविण शिवलाल गोडा
अमेय राजेश राऊत
रामा अण्णा म्हात्रे
सुवर्णा एस पितळे
सुप्रिया देशमुखे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं असून त्यांनी या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘ही घटना मोठी आहे. जे यास जबाबदार असतील त्यांची सूटका नाही.  प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहे.’

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.