सैन्याकडून नष्ट करण्यात आलेल्या लोखंडी व तांबे पितळ धातूची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

पिंपरी चिंचवड : सैन्याकडून नष्ट करण्यात आलेल्या लोखंडी व तांबे पितळ धातूची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी 29 एफ ए डी ओल्ड डेपो, किन्हाईगाव देहूरोड येथे घडली.

मीना विजय काळे (वय 60), सोनाली अविनाश भोसले (वय 30, दोघी रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत गुलाबचंद शंकर शर्मा (वय 44) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एफ ए डी ओल्ड डेपो, किन्हाईगाव येथे सैन्याने शस्त्र नष्ट केली आहेत. गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी शर्मा आणि त्यांचे सहकारी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोन आरोपी महिला फायर रेंजच्या भिंतीचे लोखंडी गज कापून आत आल्या. त्यांनी सैन्याकडून नष्ट करण्यात आलेल्या लोखंडी व तांबे पितळ धातूची चोरी केली. याबाबत सैन्याने दोघींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.