कामावरून काढून टाकल्याच्या रागातून महिलेला अश्लील फाेटो व अश्लील लिंक पाठहून विनयभंग

पिंपरी चिंचवड : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून व्हाटसअपवरून अश्लील फाेटो व अश्लील लिंक पाठहून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ एप्रिल रोजी राठी पावणेनउच्या सुमारास घडला.

प्रशांत सदाशिव सोनटक्के (रा. नमस्कारी, ता. तिवासा, जि. अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने  चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांनी आरोपी प्रशांत याला कामावरून काढून टाकले. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला फोन करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला व्हाटसअपवरून अश्लील फोटो व अश्लील लिंक पाठवून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करून फिर्यादीचा विनयभंग केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.