लॉकडाऊनच्या नाकाबंदीत दोन फरार गुन्हेगारांना अटक

पुणे :एसटी कर्मचाऱ्याच्या डोक्यात डोक्यात बीअरची बाटली फोडून जखमी करून फरार झालेल्या सराईतासह आणखी एका गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी लॉकडाऊनच्या बंदोबस्तात पकडले.

प्रफुल्ल संजय वाघमारे (वय २२, रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ) आणि त्याचा साथीदार प्रेम दशरथ कानडे (वय २५, रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी नावे आहेत.

प्रफुल्ल वाघमारे हा समर्थ पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. प्रेम कानडे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून एस टी बसचालकाच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन मारहाण केल्याचा बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल  मोहिते, पोलीस हवालदार रणजित उबाळे, पोलीस नाईक प्रमोद जगताप, महिला पोलीस नाईक स्मिता सिताप, लक्ष्मी चौधरी शिपाई निलेश साबळे, प्रियांका खराडे हे केईएम हॉस्पिटलसमोर रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर कारवाई करीत होते.

यावेळी पॉवर हाऊसकडून एका मोटारसायकलवर दोघे जण विना मास्क आले. त्यांना पोलिसांनी थांबवून मास्क न लावता संचारबंदीत का फिरता असे विचारल्यावर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गाडी केसमध्ये जप्त होती ती कोर्ट आदेशाने ताब्यात घेऊन घरी जात आहोत. प्रक्रिया करण्यास थोडा उशीर झाला असे सांगितले. निलेश साबळे यांनी गाडीचे निरीक्षक केल्यावर तिला पुढे व मागे नंबरप्लेट नसल्याचे लक्षात आले व मागे बसलेला प्रफुल्ल वाघमारे हा सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांनी ओळखले. दोघांवर विना मास्क फिरल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड केला असून प्रेम कानडे याला पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.