सकारात्मक बातमी ! पुण्यात होत आहे कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

 

पुणे :जगभरात कोरोनाने अक्षरशः आहाकार घातला असुन महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या ही अधिक असुन पुणे हे हॉट्सपॉट मानले जात आहे.मागील काही काळातील रुग्णसंख्या व आजची रुग्णसंख्येत जवळपास दोन ते अडिच हजारांनी रुग्णसंख्या घटली असुन आज दिवसभरात ३९९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ४७८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ रूग्ण पुण्याबाहेरील आहे.त्यात१३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ही ३९५४८६ असुन पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही ४९४७२. आजवर एकूण मृत्यू -६४४३ असुन आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज रुग्णांची ३३९५७१ संख्या ही मोठी आहे.आज दिवसभरात केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी २२२२७ ही आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.