सराईत हैदर सैय्यद टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची मोक्का कारवाई

पिंपरी चिंचवड :वाकडं पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार हैदर जावेद सैय्यद | शेख  टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.हैदर जावेद सैय्यद | शेख यांच्यासह ६ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.

टोळी प्रमुख हैदर जावेद सैय्यद / शेख  (वय-२६ वर्षे, रा. पिंपळे सौदागर,सांगवी, पुणे), प्रथमेश ऊर्फ सोन्या यशवंत सावंत (वय-२३ वर्षे, रा. भाग्यवंती मंदिरा जवळ,कोकणेनगर, काळेवाडी, पुणे), विनायक विनोद श्रीवास्तव (वय-२२ वर्षे, रा. हार्डकोअर जीमचे मागे, जगताप नगर, लेन क्र. ६, थेरगाव, पुणे), दिपक भिमराव सगर (वय-२१ वर्षे, रा. तुळजा भवानी कॉलनी,कोकणेनगर, काळेवाडी, पुणे), सुशिल बाळु शिंदे, वय-२१ वर्षे, रा. जोगेश्वरी हॉस्पीटल समोर, विजयनगर, काळेवाडी, पुणे), ओंकार सिताराम पांचाळ, वय-२१ वर्षे, रा. तुळजा भवानी कॉलनी, कोकणे काळेवाडी, पुणे), अनिकेत मनोज हातमकर, वय-२० वर्षे, रा. सी / ३३ घरकुल दत्तगुरु कृपा सोसा.चिखली, पुणे) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मोका कारवाई झालेल्या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत व अवैधरित्या पिस्तुल जवळ बाळगुन दहशत करणे असे
एकुण ६ गुन्हे दाखल आहेत.

हे सर्व आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता.

सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा संजय तुंगार,  यांनी सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करणे कामी मा. अपर पोलीस आयुक्त साो. पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला असता दिनांक २४ एप्रिल रोजी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे साो,आनंद भोईटे  पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, श्री. डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा (अतिरीक्त कार्यभार), विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पी.सी.बी. गुन्हे शाखा, स.पो.फौ. सुहास पाटोळे याकड पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.